
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
राफेल करारासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वोच्च न्यायालयात आपल्या चोरीची कबुली दिली आहे. मोदींची चोरी पकडली गेली आहे. मेरे दोस्त… पिक्चर अभी बाकी हैं, अशी बोचरी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. राहुल गांधींनी टिव्टरद्वारे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले. हवाई दलास विश्वासात न घेता मोदी सरकारने राफेलसाठी नवा करार केला आणि 30 हजार कोटी अनिल अंबानींच्या खिशात घातले अशी कबुली सरकारने सुप्रीम कोर्टात सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये दिल्याचा दावा राहुल गांधींनी केला आहे.




























































