भाजपकडून विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भाजपकडून आमदार ऍड. राहुल नार्वेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राहुल नार्वेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत दाखल केला. अध्यक्षपदासाठी सध्या त्यांचा एकमेव अर्ज आला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जानेवारी 2021 मध्ये अध्यक्षपद सोडले होते. तेव्हापासून हे पद रिक्तच होते.