
कोठला झोपडपट्टी भागात सुरू असलेल्या तिर्रट जुगारावर तोफखाना पोलिसांनी छापा टाकून सहा जुगाऱ्यांना पकडले आहे. त्यांच्या ताब्यातून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम व दुचाकी असा 1 लाख 4 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एजाज मुस्ताक पटेल (वय 43, रा. झेंडीगेट), गफार रज्जाक शेख (वय 52, रा. तोफखाना, मोची गल्ली), गोपाल गणपत वाकोडे (वय 45, रा. नालेगाव, कवडे गल्ली), मनोज बद्रीनारायण वर्मा (वय 40, रा. भिंगार), धीरज शिवलाल काळे (वय 50, रा. तारकपूर), अन्सार इसाक शेख (वय 44, रा. मुकुंदनगर) अशी पकडलेल्या जुगाऱ्यांची नावे आहेत.
कोठला झोपडपट्टी भागात बापुशहा दर्ग्याच्या भिंतीच्या आडोशाला काहीजण पत्त्यावर तिर्रट जुगार खेळत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना मिळाली होती. त्यांनी पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले. पथकाने रात्री नऊ वाजेच्या सुमारास तेथे छापा टाकला असता, सहाजण जुगार खेळताना मिळून आले. पेलीस उपनिरीक्षक सोळंके, अंमलदार जपे, सुनील शिरसाठ, संदीप केरूळकर, संदीप धामणे, सलीम शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली.

























































