आष्टी तालुक्यातील दूध संकलन केंद्रावर अन्न व औषध प्रशासनाची धाड

742

आष्टी तालुक्यातील काही दुधसंकलन केंद्रावर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी सकाळी अचानक धाड टाकल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. धाड टाकलेल्या दुध संकलन केंद्रातील दुधाचे नमुने पथकाने तपासणीसाठी घेतले आहेत. अन्न सुरक्षा आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आष्टी तालुक्यातील काही दूध संकलन केंद्रावर भेसळ होत असल्याच्या तक्रारी आल्याने तालुक्यातील वाघळूज, बाळेवाडी, कुंबेफळ, खुंटेफळ, टाकळी अमिया या गावातील दुध संकलन केंद्रावर धाड टाकण्यात आल्या असून दुधाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आल्या आहेत. अन्न सुरक्षा अधिकारी, सहाय्यक आयुक्त अन्न भेसळ व सह आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सुरु असून अन्न व भेसळचे राज्यातील जवळपास 25 अधिकाऱ्यांचे पथक आहे. याच परिसरात काही अंतरावर असणाऱ्या वाघजाई मंदिराच्या परिसरातील खाजगी जागेत रिकामे ड्रमही आढळून आल्याने चर्चेला उधाण आले आहे. याचा तपास अन्न व औषध प्रशासन करीत आहे. या कारवाईने तालुक्यात खळबळ उडाली आहे

आपली प्रतिक्रिया द्या