78 दिवसांचा बोनस ही केंद्र सरकारची धूळफेक, रेल कामगार सेनेने मांडले कटू सत्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र सरकारने रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांवर पैशांचा धो-धो पाऊस पडणार, त्यांना लाखो रुपये मिळणार अशी चर्चा रंगू लागली आहे. प्रत्यक्षात मात्र पेंद्र सरकारची ही घोषणा म्हणजे केवळ धूळफेक असून रेल्वे कर्मचाऱ्यांच्या खात्यात केवळ 17 हजार 951 रुपये येणार आहेत याकडे रेल कामगार सेनेने लक्ष वेधले आहे.

रेल कामगार सेनेचे अध्यक्ष शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली रेल कामगार सेना कार्याध्यक्ष संजय जोशी आणि सरचिटणीस दिवाकर देव यांच्या नेतृत्वाखाली रेल्वेने घोषणा केलेल्या बोनससंदर्भात कटू सत्य सांगितले आहे. भारतीय रेल्वेमध्ये सुमारे 13 लाख कामगार देशभरात कार्यरत आहेत. दरम्यान 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळाल्यानंतरही कर्मचाऱ्यांच्या खात्यावर फार मोठी रक्कम जमा होणार नाही, असे रेल कामगार सेनेचे म्हणणे आहे.