
देशातील पहिल्या बुलेट ट्रेनसाठी आणखी चार वर्षे वाट पाहावी लागणार आहे. बुलेट ट्रेनचे काम डिसेंबर 2029 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत दिली.
वैष्णव म्हणाले, ‘बुलेट ट्रेनचा गुजरात राज्यातील साबरमती ते वापी हा टप्पा येत्या डिसेंबर 2027 पर्यंत पूर्ण होईल आणि साबरमती ते महाराष्ट्र हा पूर्ण मार्ग डिसेंबर 2029 पर्यंत पूर्ण होईल. प्रकल्पाचा अंदाजित खर्च 1 लाख 8 हजार कोटी असून त्यापैकी 88,000 कोटींचा खर्च जपानी कंपनी करणार आहे तर उर्वरित 20,000 कोटी केंद्र, महाराष्ट्र व गुजरात सरकार करणार आहे.’