रेल्वे प्रवाशांच्या घशाला कोरड, आयआरसीटीसीच्या वॉटर वेंडिंग मशीन पडल्या बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अवघ्या एक ते दोन रुपयांमध्ये ‘आरओ’चे शुद्ध पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी रेल्वे स्थानकांवर आयआरसीटीसीने वॉटर वेंडिंग मशीन बसविल्या होत्या. परंतु या मशीन बंद पडल्या असून प्रवाशांना पाणी पिण्यासाठी पान, गुटखा आणि तंबाखूने सदैव भरलेल्या अस्वच्छ पाणपोयांचा आसरा नाइलाजाने घ्यावा लागत आहे.

तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या काळात रेल्वेच्या स्थानकांवर आयआरसीटीसीने वॉटर वेंडिंग मशीन बसविल्या होत्या. या मशीनवर ‘आरओ’चे शुद्ध पाणी माफक दरात मिळत होते. कामगारांना पगार देता येण्याएवढा फायदा पंत्राटदारांना मिळत नसल्याने या मशीन बंद पडल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आयआरसीटीसीने रेल्वे स्थानकांवर वॉटर वेंडिंग मशीन बसविल्या होत्या. या मशीनद्वारे प्रवाशांना ‘आरओ’चे शुद्ध बॅक्टेरियामुक्त पाणी स्वस्तात विकले जात होते. ब्रॅण्डेड पंपनीच्या बाटलीबंद पाण्याची किंमत जादा असल्याने अशा प्रकारे वॉटर वेंडिंग मशीनद्वारे शुद्ध पाणी मिळू लागल्याने ही संकल्पना अल्पावधीतच लोकप्रिय झाली. मात्र, लायसन्स फीच्या दरात वाढ झाल्याने पंत्राटदारांना कामगारांना पगार देण्याइतका फायदा होईना. त्यामुळे एवढय़ा चांगल्या योजनेचे पार मातेरे झाले.

‘रेलनीर’च्या विक्रीसाठी जोर…
आयआरसीटीसीचा ‘रेलनीर’ हा स्वतःचा मिनरल वॉटरचा ब्रॅण्ड प्रसिद्ध असून अंबरनाथ येथील प्रकल्पात ‘रेलनीर’चे उत्पादन केले जात असून अहमदाबादपर्यंत हे बाटलीबंद पाणी रेल्वेच्या प्रवाशांसाठी विकले जाते. बाटलीबंद पाण्याची मागणी उन्हाळ्यात वाढल्याने पश्चिम रेल्वेवर विरारपर्यंत आणि मध्य रेल्वेवर इगतपुरीपर्यंत हे पाणी विकले जात असते. त्यापुढे रेलनीर पुरविण्यासाठी नागपूर, भुसावळ, अहमदाबाद आणि भोपाळमध्ये रेलनीरचे नवीन प्रकल्प स्थापन केले आहेत.र्ं