
सामना ऑनलाईन,मुंबई
रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. भायखळा आणि चिंचपोकळी दरम्यान रुळाला तडे गेले असल्याने डाऊन दिशेची म्हणजेच सीएसएमटीवरून ठाणे, कल्याणकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. या मार्गावरील धीम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावर वळवण्यात आली आहे. यामुळे डाऊन दिशेच्या लोकल गाड्या उशिराने धावत आहेत. याचा परिणाम हा उप दिशेच्या वाहतुकीवरही होणार आहे, कारण अनेक गाड्या या ठाणे, कल्याणवरून परत उलट्या फिरवल्या जातात. सोमवारी रात्री भायखळा आणि चिंचपोकळी दरम्यानची डाऊन दिशेची जलद वाहतूक विस्कळीत झाली होती.





























































