मुंबईत विजांच्या कडकडाटासह पाऊस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबईत तापमान 32 अंशांपलीकडे गेलेले असताना गुरुवारी सायंकाळी अचानक विजांच्या कडकडाटासह बरसलेल्या पावसाने दिलासा दिला. मुंबई शहरासह उपनगरात बरसलेल्या या पावसाने शेवटच्या दिवसाच्या गरब्याच्या उत्साहावर पाणी फेरले तर दुसरीकडे देवीच्या विसर्जनासाठी गेलेल्यांचीही चांगलीच तारांबळ उडाली.

मुंबईत सलग दोन दिवस सायंकाळी ढगाळलेले हवामान आणि विजांचा कडकडाट होता, मात्र शहरात काल थोड्याशा पडलेल्या पावसाने आज जोरदार हजेरी लावली. गेले 24 तास मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यातल्या काही भागांत पाऊस पडत आहे. दरम्यान, कोकण, गोका आणि उत्तर-मध्य महाराष्ट्रातले दिवसाचे तापमानही 2 ते 3 अंश सेल्सियसने कमी झालेले आहे. परिणामी गुरुवारी दिवसभरातही मुंबईकरांना उष्णतेच्या फारशा झळा बसलेल्या नव्हत्या. त्यातच सायंकाळी आलेल्या पावसाने वातावरणात अधिक गारवा आणला.