शिरूर तालुक्यात वादळी वारे आणि मेघगर्जनेसह पाऊस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिरूर तालुक्यामध्ये वादळी वारे आणि  मेघगर्जनेसह मोठ्या पावसाच्या सरी बरसल्या. यामध्ये येरोळ येथील हुसेन पठाण या  अल्पभूधारक शेतकऱ्यांची म्हैस  वीज पडून जागीच ठार झाली. या म्हशीची किंमत 50 हजार रुपये असून यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झालेले आहे.

ढोबळे वाडी येथील गोपाळ वाघमोडे यांची जवळपास दीड लाख रुपयांपर्यंतची बैलांची जोडी वीज पडून मृत्युमुखी पडली आहे. हे दोन्ही शेतकरी अल्पभूधारक आहेत. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे. याबाबत  संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे. उद्या मरण पावलेल्या बैलांच्या जोडीचा पंचनामा करण्यात असल्याचे त्यांनी तलाठ्यामार्फत कळवले आहे.

अचानक पडलेल्या या पावसामुळे तालुक्यातील बऱ्याचशा गावांमध्ये वीज गेली असून सर्वत्र अंधार पसरलेला होता. येरोळ मोड येथील पोलसुद्धा वादळी वाऱ्याने पडलेले आहेत. एकंदरीत या अवकाळी पावसामुळे दोन बळीराजांचे फार मोठे नुकसान केले.  या नुकसानभरपाईसाठी दोन्ही गावांतील अल्पभूधारक शेतकरी प्रतिक्षेत आहेत. लवकरात लवकर सर्व प्रक्रिया पूर्ण करून  शेतकऱ्यांना मदत मिळावी, अशी सर्व नागरिकांतून मागणी केली जात आहे.