
मॉन्सूनच्या स्वरुपात गेल्या काही वर्षात महत्त्वाचे बदल झाल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. 1901 नंतर 2020 मध्ये झालेला पाऊस हा सर्वाधिक आहे. आकडेवारीवर नजर टाकल्यास 2020 मध्ये झालेल्या पावसाचे प्रमाण चांगले असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. यंदा पावसाचे प्रमाण चांगले असले तरी मॉन्सूनच्या स्वरुपात मोठे बदल झाले आहेत. काही ठिकाणी महिन्याभरात संपूर्ण गंहामातील पाऊस पडल्याचे दिसून आले आहे.
देशभरात 1950 पासून पावसाच्या प्रमाणात सातत्याने घट होत असल्याचे दिसून आले आहे. तसेच पावसाचे प्रमाणही विषम झाले आहे. काही वर्ष कमी काळात अतिवृष्टी झाल्याचे दिसून येते. यंदा 1901 नंतर सर्वाधिक पाऊस झाल्याची नोंद आहे. यंदा पावसाचे प्रमाण वाढले, ही समाधानाची बाब असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. रविवार सकाळपर्यंत देशभरात 771.1 मिमी पाऊस झाला आहे. 1 जून ते 30 ऑगस्ट या काळात 1901 नंतर झालेला हा सर्वाधिक पाऊस आहे. असा पाऊस 1901 नंतर 11 वेळा झाल्याची नोंद आहे.
यंदाचे पाऊसमान चांगले आहे. 1950 नंतर घट होणाऱ्या पाऊसमानात यंदा वाढ झाली आहे. या वर्षात 1 जून ते 30 ऑगस्टदरम्यान सरासरीइतक्या पावसाची नोंद झाली आहे. 1 जून ते 30 सप्टेंबरपर्यंत मान्सूनचा हंगाम असतो. मात्र, बदललेल्या मॉन्सूनच्या स्वरुपामुळे ऑगस्टपर्यंतच पाऊस पडतो. तर काही ठिकाणी महिन्याभरात हंगामातील सर्व पाऊस पडतो. गेल्या दशकात 122 दिवसातील हंगामातील निम्मा पाऊस अवघ्या 40 दिवसात पडला होता. तर 75 टक्के पाऊस 70 दिवसात आणि 90 टक्के पाऊस 94.3 दिवसात झाला होता. याप्रमाणे कमी वेळेत सर्वाधिक पाऊस पडत असल्याचे या दशकात दिसून आले आहे. त्यामुळे देशातील मॉन्सूनचा हंगाम लवकर संपत आहे. मॉन्सूनच्या स्वरुपात प्रादेशिक असमतोलही दिसून आला आहे. नवी दिल्लीत 83 दिवसातच मॉन्सूनचा हंगाम संपल्याची नोंद आहे. तर कर्नाटकात अवघ्या 30 दिवसात मॉन्सूनचा हंगाम संपल्याचे दिसून आले आहे.



























































