पाऊस सुरू झालाय, जरा जपून; आजारांपासून बचावासाठी तज्ञांचा सल्ला

3814
फोटो- प्रातिनिधीक

पाऊस चांगलाच सुरू झाला आहे. वातावरणात सुखद गारवा पसरला आहे. पण पावसाचा आनंद घेताना तब्येतीची काळजी घ्या. पाऊस आला की मलेरिया, डेंगू, लेप्टोस्पायरोसिस, टायफॉईड, डायरिया असे विविध आजार सुरू होतात. ते टाळण्यासाठी स्वच्छतेबरोबरच सावधगिरी फार महत्वाची आहे. ‘प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर’ या वैद्यकीय म्हणीप्रमाणे आपली दैनंदिनी बनवली तर पावसाळी आजार टाळता येतील असे आवाहन या क्षेत्रातील तज्ञ डॉ. ज्ञानेश पाटील यांनी केले आहे.

आजार टाळण्यासाठी काय कराल?
– पाणी उकळून व गाळून प्या.
– फ्लॉवरपॉटमधील पाणी नियमित बदला.
– बाहेरचे खाद्यपदार्थ, पेये टाळा
-साचलेल्या पाण्यात जाणे टाळा.
– रोगप्रतिकारक शक्ती कायम ठेवण्यासाठी वेळेकर जेवण, पुरेशी झोप घ्या.
– रोज किमान अर्धा तास व्यायाम करा

ही काळजी आवश्यक
– पावसात भिजल्यास अंगावर ओले कपडे अधिक काळ ठेवू नये.
– डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी घराजवळ, गच्चीवर डबकी साठू देऊ नका.
– संत्रे, लिंबू यासारखी आम्लयुक्त फळे पुरेशा प्रमाणात खावीत
– मधुमेह, रक्तदाब, अस्थमाच्या रुग्णांनी औषधे वेळेकर घ्याकीत.
– अधिक त्रास झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्याका.

आपली प्रतिक्रिया द्या