
तृतीयपंथीयांना स्त्री किंवा पुरुष बनवण्याची एक नवीन सन्मान योजना राजस्थान सरकारने आणली आहे. या योजनेंतर्गत तृतीयपंथीयांवर शस्त्रक्रिया करून त्यांना स्त्री किंवा पुरुष बनवण्यात येणार आहे.
या शस्त्रक्रिया सरकारी रुग्णालयात करण्यात येणार आहेत. लिंगबदल शस्त्रक्रिया करवून घेणाऱ्या तृतीयपंथीयांना राजस्थान सरकारतर्फे 2.50 लाख रुपये देण्यात येणार आहेत. यासाठी राजस्थान सरकारने 10 कोटी रुपये खर्चून सामाजिक न्याय आणि अधिकार विभागाने विशेष कोषाची स्थापना केली आहे.
ज्या तृतीयपंथीयांना शस्त्रक्रिया करवून घ्यायची असेल त्यांनी या विभागाशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे. राजस्थानमध्ये सध्या 20 हजारांहून जास्त तृतीयपंथीय आहेत. त्यांना सन्मानजनक आयुष्य जगता यावं या हेतूने गहलोत सरकारने ही योजना बनवली आहे.




























































