
देशात सध्या कोरोना लसीकरणासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असताना राजस्थानमध्ये 320 कोरोनाच्या लसीची चोरी झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ही देशातील पहिलीच घटना आहे. राजस्थानची राजधानी जयपूर येथील एका सरकारी रुग्णालयातून लसीकरणाची चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे.
या लसीकरण केंद्रातून 320 कोवॅक्सिनचे डोस चोरण्यात आले आहेत. याप्रकरणी आरोग्य विभागाने अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोग्य विभागही याची तपासणी करणार आहेत. दरम्यान, ज्या ठिकाणाहून लस चोरण्यात आली आहे त्या ठिकाणचे केवळ सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे रुग्णालयातील कर्मचाऱयांच्या संगनमताने ही चोरी केली गेली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच बेकायदेशीर लस देणाऱयांचे रॅकेट असल्याचा संशयदेखील पोलिसांनी व्यक्त केला आहे.

























































