आरटीपीसीआर रिपोर्ट घेऊनच लग्नाला यायचं हं! राजस्थानातील लग्नपत्रिकेची सर्वत्र होतेय चर्चा

राजस्थानातील जयपूरमध्ये 24 एप्रिलला विजय आणि वैशाली यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. मात्र कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर लग्नसोहळा निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी या जोडप्याने विशेष खबरदारी घेतली आहे. लग्नाला येताना कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट सोबत घेऊन येण्याची विनंती पाहुणे मंडळींना पत्रिकेतून करण्यात आली आहे. पाहुण्यांना ऍण्टीजेन नाही तर आरटीपीसीआर चाचणीचा रिपोर्ट सोबत आणावा असे पत्रिकेत ठळक अक्षरात लिहिण्यात आले आहे. तसेच या लग्नात मास्क आणि हात सॅनिटायझर करण्याची देखील व्यवस्था असणार आहे.

देशात कोरोनाची दुसरी लाट पसरली असून कोरोनाचा वेगाने प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सार्वजनिक कार्यक्रम आणि लग्न समारंभांवर मर्यादा घालण्यात आल्या आहेत. काही राज्यांमध्ये आता लग्नसोहळ्यासाठी 25 तर काही राज्यांत केवळ 50 जणांना सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या