रजत शर्मा का आले नेटकऱ्यांच्या निशाण्यावर, वाचा सविस्तर

4301

हिंदी वृत्तवाहिनी इंडिया टिव्हीचे मुख्य संपादक रजत शर्मा यांनी शुक्रवारी केलेले एक ट्वीट त्यांच्या चांगलेच अंगाशी आले आहे. नेटकाऱ्यांनी त्यांना चांगलेच झोडले आहे. ज्या शहरात अजूनही काही लोक लॉकडाऊन न पळता भाजीपाला खरेदीसाठी रस्त्यावर येत आहेत अशा शहरांची नावे आपल्या ट्वीट मध्ये लिहिली आहेत. मात्र असे करताना त्यांनी केवळ बिगर भाजपशासित राज्यांची नावे लिहिली आहेत. ज्यामुळे ते नेटकाऱ्यांच्या निशाण्यावर आले आहेत.

रजत शर्मा यांनी आपल्या ट्वीटमध्ये ‘दिल्लीच्या जामा मशीद समोर क्रिकेट सुरू आहे, मुंबईच्या भांडुपमध्ये भाजी बाजार सुरू आहे. कोलकाताच्या बाजारात भाजीपाल्याची दुकानं लागली आहेत. लॉक डाऊन तोडण्याची अशी असंख्य उदाहरणे आहेत. अपील खूप झाले आता सक्ती करण्याची वेळ आली आहे’ असे म्हटले आहे. या मध्ये ज्या तीन शहरांच्या नावाचा प्रामुख्याने उल्लेख करण्यात आला आहे ते बिगर भाजप शासित राज्ये आहेत. यामुळे नेटकरी संतापले आणि त्या ट्वीटचा चांगलाच समाचार घेतला.

संजीव सिंह नावाचा एक युजर लिहितो, ‘तुम्ही म्हणता ते ठीक पण गुजरात, मध्य प्रदेश मध्ये तुमच्या कॅमेऱ्याच्या लेन्सवर झाकण लावलं होतं का? इथे रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत मृतांचा आकडा मोठा का आहे? असे प्रश्न विचारा’. संजय कुमार नावाचा युजर लिहितो की, ‘न्यूज चॅनेल देखील बंद करण्याची वेळ आली आहे’. तर एक युजर लिहितो की ‘भाजपची सत्ता असलेल्या राज्यात सगळे नियम पाळताहेत का?’, ‘उत्तर प्रदेश मध्ये अनेक भागात लॉकडाऊन तोडलं जात आहे’. अशा ट्वीटचा भडिमार झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या