वाढदिवसाच्या माध्यमातून दर्डांचे कमबॅक!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रशेखर कुलकर्णी, संभाजीनगर

राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या कार्यकाळातील शिक्षणमंत्री, उद्योगमंत्री आणि दोनदा आमदार राहिलेले राजेंद्र दर्डा २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यापासून सक्रिय राजकारणापासून अलिप्तच झालेले होते. २१ नोव्हेंबर रोजी आपल्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या अभिनंदनाच्या संपूर्ण शहरभर मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेल्या होर्डिंग्जमुळे आणि जंगी वाढदिवस साजरा केला जात असल्यामुळे या वाढदिवसाच्या माध्यमातून राजेंद्र दर्डा स्थानिक राजकारणात पुन्हा कमबॅक करीत असल्याचे संकेत मिळत आहेत.

अधिकृतरीत्या १९९७ मध्ये काँग्रेसचे सदस्यत्व घेतलेल्या राजेंद्र दर्डा यांनी १९९९, २००४ आणि २००९ अशा तीन वेळा विधानसभेच्या निवडणुका जिंवूâन संभाजीनगरचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले. या कार्यकाळात त्यांनी उâर्जा, वित्त, नियोजन, गृह, उद्योग आणि शिक्षणमंत्रीपद सांभाळले. कोळसा घोटाळ्यापासून ते स्थानिक पातळीवरील काही प्रकरणांत त्यांची काहीशी बदनामी झाली खरी, परंतु त्यांना खरा फटका बसला तो २०१४ च्या निवडणुकीत. त्यांची मुस्लिम वॉर्डातूनच वाहणारी कथित विकासाची गंगा संभाजीनगरच्या १३ मोठ्या नाल्यांतून वाहून गेली आणि ज्या मुस्लिम मतांच्या भरवशावर ते होते. त्याच मतदारांचा त्यांना चांगलाच फटका बसला.

२०१४ च्या निवडणुकीत लाखो मतांच्या फरकाने निवडून येण्याचे दिवास्वप्न पाहणारे दर्डा चक्क तिसऱ्या स्थानावर फेकले गेले, अतिशय नवखे अतुल सावे निवडून आले. भरवशाचा मतदार धर्माच्या नावाखाली एकवटून बाजूूला झाल्याची वस्तुस्थिती त्यांनी एवढी मनाला लावून घेतली की, तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी अपवाद वगळता कधीही सार्वजनिक जीवनात आपले अस्तित्व दाखवले नाही. काँग्रेसच्या महत्त्वाच्या यल्गार यात्रा, दुष्काळी परिषद, नोटा बंदी विरोधी आंदोलन, पेट्रोल-डिझेलची भाववाढीच्या निषेधार्थ, महागाई विरोधात केलेली आंदोलने यांसारख्या कार्यक्रमातही दर्डा दिसले नाहीत. नावापुरते कधी भाजपमध्ये तर कधी अन्य पक्षात येण्याजाण्याच्या चर्चा झाल्या आणि विरल्यासुद्धा! शेवटी राजकारणातून चक्क सन्यास घेतल्याची चर्चा सुरू झाली.

आज २१ नोव्हेंबर रोजी त्यांचा ६६ वा वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त त्यांनी शुभेच्छा स्वीकारल्या. त्याकरिता त्यांनी जंगी कार्यक्रम आयोजित केला होता. येथपर्यंत ठिक होते, पण त्याहीपुढे जाऊन शहरभर आणि विशेषत: संभाजीनगर पूर्व आणि मध्य या दोन मतदारसंघांत त्यांच्या अभिनंदनाचे मोठ्या प्रमाणात शुभेच्छांचे होर्डिंग लागले आहेत. ऐन निवडणूक लागण्याच्या काही काळ आधी प्रत्येक इच्छुक सक्रिय होण्याच्या नेमक्या वेळी दर्डाही पोस्टरबाजी आणि वाढदिवसाच्या जंगी पार्टीच्या माध्यमातून सक्रिय झालेले दिसून येत आहेत. त्यांच्या शुभेच्छांच्या फलकावरील त्यांच्या व्यक्तिमत्वाचे कौतुक करणाऱ्या मजकुरावरून तर ते निश्चितच आगामी सार्वत्रिक निवडणुकीत सक्रिय होत असल्याची चिन्हे आहेत. संपूर्ण शहरातील पूर्व व मध्य या दोन्ही विधानसभा मतदारसंघांत त्यांच्या शुभेच्छांचे होर्डिंग लावण्यात आले आहेत. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर साजरा होत असलेला त्यांचा वाढदिवस हा त्यांचा राजकारणातील कमबॅक असल्याची चर्चा राजकीय कार्यकत्र्यांमध्ये सुरू आहे.