रेल कामगार सेनेचे राजेंद्र पाटोळे सेवानिवृत्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेल कामगार सेनेचे सहकार्याध्यक्ष राजेंद्र पाटोळे हे 40 वर्षे प्रदीर्घ सेवा केल्यानंतर 31 मे 2022 रोजी रेल्वे सेवेतून निवृत्त झाले असल्याने त्यांचा रेल कामगार सेना, माटुंगा युनिटच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला. या सोहळ्यास रेल कामगार सेनेचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ, आमदार रमेश कोरगांवकर, भारतीय कामगार सेनेचे चिटणीस मनोज जामसुतकर, रेल कामगार सेनेचे कार्याध्यक्ष संजय जोशी, सरचिटणीस दिवाकर देव ऊर्फ बाबी, संयुक्त सरचिटणीस नरेंद्र शिंदे व पाटोळे कुटुंबीय उपस्थित होते.

राजेंद्र पाटोळे नोकरी करीत असताना माटुंगा कारखान्यातही स्थानीय लोकाधिकार समितीत कार्यरत राहिले. स्थानीय लोकाधिकार समितीचे नेते शरदचंद्र महाडिक यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलनात अग्रभागी राहून त्यांनी पुढाकार घेतला. 1989 मध्ये माटुंगा कारखाना तीन दिवस खलासी भरतीकरिता बंद ठेवला होता. पाटोळे आंदोलनात सक्रिय राहिले असले तरी त्यांनी आपला संसार नेटाचा केला. त्यांना दोन कन्या असून एक डॉक्टर झाली तर दुसरी नार्ंसग कोर्स करीत आहे. हा सत्कार सोहळा रेल कामगार सेना माटुंगा युनिटचे अध्यक्ष प्रमोद जळगावकर व चंद्रकांत विनरकर यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला. उपाध्यक्ष सूर्यकांत आंबेकर, क्लिफर्ड डिसोझा, परशुराम राणे, संजय चिपकर, दिनेश भुर्वे, सुधाकर देवकाते, शशिकांत काळे, विनोद ठाकूर, सचिन मयेकर, दिनेश खंडाळे, चिंतामणी निखार्गे, मंगेश जोशी, चंद्रकांत जळगावकर, हितेश भोळे व मिलिंद पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले.