#Article370 राजकारण्यांना राजकारण कसे करावे व कशाचे करू नये हे माहिती हवे! – रजनीकांत

1150

जम्मू-कश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर सुपस्टार रजनीकांत यांनी पुन्हा एकदा विधान केले आहे. मोदी सरकारने ज्या प्रकारे नियोजन करत हा निर्णय घेतला ती एक ”मास्टर स्ट्रॅटेजी” होती, असा शब्दात रजनीकांत यांनी सरकारचे कौतुक केले. याआधी कलम 370 रद्दबातल झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची जोडी कृष्ण अर्जुनासारखी असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.

मोदी शाह यांची जोडी कृष्ण अर्जुनासारखी, सुपरस्टार रजनीकांतची स्तुतीसुमने

सुपस्टार रजनीकांत म्हणाले, त्यांनी (केंद्र सरकार) आधी कश्मीर खोऱ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कलम 144 लागू केले. यानंतर हे विधेयक राज्यसभेत (बहुमत नसतानाही) आणि त्यानंतर लोकसभेमध्ये मंजूर केले. सरकारने अतिशय नियोजित पद्धतीने हे पाऊल उचलले. राजकारण्यांना हे माहित असायला हवे की राजकारण कसे करावे आणि कशाचे राजकारण करू नये, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. तसेच सरकारच्या या निर्णयाचे मी कौतुक करतो, कारण ते राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या