राजीव शुक्ला बीसीसीआयचे नवे अध्यक्ष होणार

बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी यांचा कार्यकाल संपल्यामुळे पुढील तीन महिन्यांसाठी उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांच्याकडे प्रभारी अध्यक्षपद सोपविणार असल्याची माहिती बीसीसीआय सूत्रांनी दिली आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात बीसीसीआयच्या सर्वसाधारण सभेत नव्या अध्यक्षांच्या निवडणुकीतही ते उभे राहू शकतात. काँग्रेसचे राज्यसभा खासदार असलेले राजीव शुक्ला हे आयपीएलचे आयुक्तही राहिले आहेत. 2022 मध्ये सौरभ गांगुली यांनी अध्यक्षपद सोडल्यानंतर बिन्नी यांनी कार्यभार सांभाळला होता. त्यावेळी ते अध्यक्षपदाला उभे राहणारे एकमेव उमेदवार होते. बिन्नी यांच्या कार्यकाळात हिंदुस्थानने आयसीसी टी-20 वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी या दोन जागतिक स्पर्धा जिंकल्या आहेत.