राजकुमार राव मतदारांना ‘जागे’ करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छत्तीसगढच्या नक्षलग्रस्त भागात मतदान सुरळीत पार पाडण्याची जबाबदारी सोपवण्यात आलेल्या सुरक्षा अधिकाऱयाची भूमिका ‘न्यूटन’ चित्रपटात साकारणाऱया राजकुमार राव याला निवडणूक आयोगाने ‘नॅशनल आयकॉन’ म्हणून नियुक्त केले आहे. निरुत्साही मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आयोगाकडून वेळोवेळी नामवंत हिंदुस्थानींची ‘नॅशनल आयकॉन’ म्हणून नियुक्ती करण्यात येत असते. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे व अरुण गोयल यांनी राजकुमार याचे स्वागत केले.