Lok sabha 2019 राजनाथ सिंह यांनी लखनौतून उमेदवारी अर्ज दाखल केला

24

सामना ऑनलाईन । लखनौ

गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी लखनौ लोकसभा मतदारसंघातून मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. उपमुख्यमंत्री डॉ. दिनेश शर्मा, वरिष्ठ अधिवक्ते एलपी मिश्रा, उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश सुधीर चंद्र वर्मा, माजी राज्यसभा सदस्य राम नारायण साहू हे यावेळी उपस्थित होते. राजनाथ सिंह यांच्यासह मोहनलालगंजमधून कौशल किशोर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी भाजपने मोठा रोड शो केला. रोड शोदरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूने तुफान गर्दी झाली होती.

मंगळवारी राजनाथ सिंह यांनी सकाळी हनुमान सेतू मंदिरामध्ये जाऊन पूजा केली. तसेच शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन जलाभिषेक केला. यानंतर भाजप प्रदेश कार्यालयापासून रोड शोला सुरुवात झाली. रोड शोचा भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रोड शोनंतर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन राजनाथ सिंह यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. 2014 मध्ये राजनाथ सिंह यांनी येथून मोठा विजय मिळवला होता. लखनौमध्ये पाचव्या टप्प्यात मतदान होत असून उमेदवारी दाखल करण्याची अंतिम तारीख 18 एप्रिल आहे.

आपली प्रतिक्रिया द्या