
राज्यसभेत महाराष्ट्रातून भाजपच्या केवळ दोन जागा निवडून येण्याची शक्यता असताना तिसरा उमेदवार उभा करून फोडाफोडीचे राजकारण करण्याचा प्रयत्न भाजप नेत्यांनी करून पाहिला, पण महाविकास आघाडीच्या भक्कम तटबंदीपुढे त्यांचे काहीच चालले नाही. बहुतांश अपक्ष व छोटय़ा पक्षाच्या आमदारांनीही आघाडीच्या मागे ठामपणे उभे राहण्याची भूमिका घेतल्याने सैरभैर झालेल्या भाजप नेत्यांनी आपला पराभव दिसू लागताच रडीचा डाव सुरू केला आहे. मविआच्या काही आमदारांच्या मतदान प्रक्रियेला आक्षेप घेत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. मध्यरात्री उशिरापर्यंत निवडणूक आयोगाने निर्णयच न दिल्याने मतमोजणी लटकली.
भाजपकडून तीन मतांना आक्षेप
– राज्यसभा निवडणुकीची मतपत्रिका भरल्यानंतर संबंधित आमदाराने आपल्या गटाच्या निवडणूक प्रतिनिधीला आपली मतपत्रिका दाखवणे आवश्यक आहे. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपली मतपत्रिका राष्ट्रकादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना दाखवण्याऐवजी ती त्यांच्या हातात दिली.
– महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांनीही आपली मतपत्रिका नाना पटोले यांच्या हातात दिली.
– शिवसेना आमदार सुहास कांदेंनीदेखील आपल्या प्रतिनिधीबरोबरच इतरांना ती दाखवली.
– असे आक्षेप भाजपकडून घेण्यात आले. मतदान अधिकाऱयांनी त्यांचा हा आक्षेप फेटाळून लावल्याने भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेत या तीनही आमदारांचे मत बाद करण्याची मागणी केली आहे. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्तांकडे याबाबतची तक्रार केली आहे.
महाविकास आघाडीचीही तक्रार
महाविकास आघाडीच्या वतीने भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार व अपक्ष आमदार रवी राणा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. या दोन्ही आमदारांनी मतदान प्रक्रियेचे उल्लंघन केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. या तक्रारीवर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱयांमध्ये रात्री उशिरापर्यंत बैठक तक्रार सुरू होती. भाजपने महाविकास आघाडीच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर रात्री महाविकास आघाडीच्या वतीने तक्रार दाखल केली.
नेमका काय आक्षेप…
– सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांची मतपत्रिका आशीष शेलार व चंद्रशेखर बावनकुळे यांना दाखवल्याचा महाविकास आघाडीचा आक्षेप आहे.
– रवी राणा यांनी हनुमान चालिसा दाखवून हिंदू मते प्रभावित केल्याचा आक्षेप शिवसेनेने घेतला आहे. हनुमान चालिसा हे धार्मिक पुस्तक उघडपणे प्रदर्शित करून मतदान प्रक्रियेचा भंग केला आणि इतर मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला व मतपत्रिकेच्या गोपनीयतेचे उल्लंघन केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
विधिमंडळात दिवसभर काय घडले…
राज्यसभेच्या सात जागांसाठी सकाळी 9 वाजता मतदानाला सुरुवात झाली. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सर्वप्रथम मतदानाचा हक्क बजावला.
विधान भवनापासून जवळच असलेल्या ट्रायडंट हॉटेलमध्ये वास्तव्याला असलेले शिवसेना आमदार लक्झरी बसने न येता चालत आले. शिवसेना आमदारांच्या ‘एण्ट्री’ने एकदम माहोल बदलून गेले. पवई येथील पंचतारांकित हॉटेलमधून काँग्रेस आमदार लक्झरी बसमधून मतदानासाठी आले.
भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आजारी असल्याने त्यांना पुण्याहून ऍम्ब्युलन्समधून मतदानासाठी पुण्यातून मुंबईत आणले. भाजपच्याच मुक्ता टिळक यांचीही प्रकृती चांगली नसल्याने त्याही व्हीलचेअरवरून मतदानासाठी आल्या. शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी हे वॉकरचा आधार घेत हळूहळू चालत मतदानासाठी आले.
दुपारनंतर मंत्री आणि आमदारांची वर्दळ वाढली. काही वेळातच पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आले. त्यापाठोपाठ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आले.
शिवसेनेचे उमेदवार शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, संजय पवार, काँग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगढी, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार व महाविकास आघाडीचे इतर नेतेही विधान भवनात तळ ठोकून होते. मतदानाच्या दिवशी अखेरच्या क्षणापर्यंत महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये बैठकांचा सिलसिला सुरू होता.
मतदान करून आमदार विधान भवनाच्या बाहेर पडताच टीव्ही चॅनेलच्या प्रतिनिधींचा गराडा पडत होता. खासकरून अपक्ष आमदार व छोटय़ा पक्षाचे आमदार मतदान करून बाहेर येताच कोणाला मत दिले, अशा प्रश्नांचा भडिमार होत होता.
285 आमदारांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर 4 वाजता मतदानाची वेळ संपली. मग सुरू झाली निकालाची प्रतीक्षा…
‘एमआयएम’चे इम्तियाज जलील आणि सपाचे अबू आझमी यांनी महाविकास आघाडीच्या बाजूने आपल्या आमदारांनी मतदान केल्याचे सांगितले. ‘बविआ’ कुणाच्या बाजूने हे मात्र गुलदस्त्यातच राहिले.
विधान भवन ते नवी दिल्ली
1 भाजपचे पराग अळवणी यांनी राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड आणि कॉँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांच्या मतदानास आक्षेप घेतला. तर भाजपच्याच अतुल सावे यांनी शिवसेनेचे सुहास कांदे यांच्या मतदानास आक्षेप घेत त्यांचे मत बाद करण्याची मागणी केली.
2 ही मागणी निवडणूक अधिकाऱयांनी फेटाळली. त्यानंतर दिल्लीतील भाजप मुख्यालयात हालचाल झाली आणि मुख्तार अब्बस नक्वी लेखी तक्रार घेऊनच केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयात धडकले.
3 या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने मतमोजणीची प्रक्रिया थांबविण्याचे आदेश राज्यातील निवडणूक अधिकाऱयांना दिले. भाजपने मतदान प्रक्रियेबाबत घेतलेला आक्षेप व त्या अनुषंगाने केलेल्या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर, सुहास कांदे यांनी केलेल्या मतदानाच्या वेळीचे व्हिडीओ फुटेज तपासणीसाठी मागवले.
4 त्यानंतर शिवसेनेने सुधीर मुनगंटीवार आणि रवी राणा यांच्या मतदानास आक्षेप घेतला.
5 रात्री उशिरा काँग्रेसनेही आपला तक्रार अर्ज निवडणूक आयोगाकडे दाखल केला.
6 केंद्रीय निवडणूक आयोगाने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्रातील निवडणूक अधिकाऱयांची बैठक घेतली. मात्र रात्री उशिरापर्यंत निर्णय दिला नाही.
7 मतमोजणी शनिवारी सकाळी 11 वाजता करावी अशी मागणी शिवसेनेने रात्री उशिरा निवडणूक आयोगाकडे केली.
राजस्थानात भाजपचा धुव्वा, चारपैकी तीन जागा काँग्रेसने जिंकल्या
महाराष्ट्रात तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी पुरेसे संख्याबळ नसताना राज्यसभा निवडणुकीत एक अधिकचा उमेदवार उभा करत फोडाफोडीचे राजकारण करण्याचा प्रयत्न भाजपने केला. तसाच प्रयत्न राजस्थानमध्येही उद्योगपती सुभाष चंद्रा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून भाजपने केला. पण राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मतांचे योग्य नियोजन करत काँग्रेसचे प्रमोद तिकारी, मुकुल वासनिक आणि रणदीप सुरजेवाला यांना निवडून आणत भाजपचा धुव्वा उडवला. भाजपचे घनश्याम तिकारी किजयी झाले आहेत. भाजपपुरस्कृत सुभाष चंद्रा यांचा पराभव झाला.
कर्नाटकमधून सीतारामन, जयराम रमेश विजयी
कर्नाटकमधून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश विजयी झाले आहेत. कर्नाटकमध्ये भाजपची सत्ता असून चारपैकी तीन जागा भाजपने जिंकल्या आहेत. भाजपचे उमेदवार जग्गेश आणि माजी आमदार लेहरसिंह सिरोया हे विजयी झाले आहेत. सीतारामन आणि जयराम रमेश हे कर्नाटकमधून सलग दुसऱयांदा निवडून जात आहेत. जेडीयूकडून एक उमेदवार रिंगणात होता. त्याचा पराभव झाला.
कपिल सिब्बल, चिदंबरम, राजीव शुक्लांसह 41 जण बिनविरोध राज्यसभेवर
देशभरात आज झालेल्या राज्यसभा खासदारकीच्या निवडणुकीत 41 उमेदवार हे बिनविरोध निकडून आले. यात काँग्रेसचे माजी खासदार कपिल सिब्बल, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि राजीक शुक्ला यांचा समावेश आहे. चार राज्यांमध्ये 16 जागांसाठी आज मतदान झाले. उत्तर प्रदेशमधून 11 खासदार बिनविरोध निकडून आले. यात भाजपचे 8 तर समाजकादी पक्षाच्या 3 खासदारांचा समावेश आहे. आंध्र प्रदेशमधून 4 जागांवर वायएसआर काँग्रेसचे खासदार निवडून आले. बिहारमधून भाजपचे 2, आरजेडीचे 2 आणि जेडीयूचा एक तर तामीळनाडूमधून 6 खासदार निवडून आले. डीएमकेकडून 3, एआयडीएमकेकडून एक आणि काँग्रेसकडून माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम बिनविरोध आले. मध्य प्रदेशमधून भाजपचे दोन तर काँग्रेसचा एक उमेदवार निवडून आला. ओडिशामध्ये तीनही जागांवर बीजेडीचे उमेदवार आले. तेलंगणात दोन जागांवर टीआरएस आणि छत्तीसगडमध्ये दोन्ही जागांवर काँग्रेसचे उमेदवार बिनविरोध आले.
हरयाणातही भाजपकडून तक्रार
हरयाणामध्येदेखील भाजपने केंद्रीय निकडणूक आयोगाकडे राज्यसभा निकडणुकीत अनियमितता झाल्याची तक्रार केली आहे. भाजपकडून काँग्रेसचे आमदार किरण चौधरी आणि बीबी बत्रा यांच्या मतांकर आक्षेप घेण्यात आला आहे. या आमदारांनी अधिकृत एजंटऐकजी इतरांनादेखील आपली मतं दाखकली, असा आक्षेप भाजपकडून घेण्यात आला आहे.
2017 मध्ये अहमद पटेल अर्ध्या मताने झाले होते विजयी
गुजरातमध्ये 2017 मध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या दोन आमदारांनी क्रॉस कोटिंग करत आपली मतपत्रिका तिथं उपस्थित असलेल्या भाजपच्या अमित शहा यांना दाखकली. त्यानंतर काँग्रेसनं याकर आक्षेप घेत याबाबत निकडणूक आयोगाकडे धाक घेतली. दरम्यान, निवडणूक आयोगाने मतमोजणी थांबकली आणि दोन्ही बाजू ऐकून आणि तेथील सीसीटीक्ही फुटेज पाहून आयोगाने दोन आमदारांची मते तब्बल पाच तासांनंतर रद्द ठरकली. यामुळे राज्यसभा निकडणुकीत काँग्रेस उमेदकार अहमद पटेल हे अकघ्या अर्ध्या मताने किजयी झाले होते आणि भाजप उमेदवार बलवंतसिंह राजपूत यांचा पराभव झाला होता.
मी कोणत्याही नियमाचा भंग केलेला नाही
मतदान करतेवेळी मी निवडणूक प्रक्रियेच्या कोणत्याही नियमाचा भंग केलेला नाही. कारण नसताना उगाचच माझ्याबद्दल गैरसमज पसरवण्यात येत आहेत. हा रडीचा डाव असल्याची प्रतिक्रिया गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
जितेंद्र आव्हाड यांनी चुकीच्या पद्धतीने मतदान केल्याचा आक्षेप भाजपने घेतला आहे. हे प्रकरण केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत पोहोचले आहे. आव्हाड यांनी याबाबत त्यांची बाजू मांडताना स्पष्ट केले, मी मतपत्रिकेवर मत नोंदवल्यानंतर माझ्या पक्षाच्या अधिकृत प्रतिनिधींना माझी मतपत्रिका नियमानुसार दाखवली. ती दाखवली नसती तर पक्ष माझ्यावर कारवाई करू शकतो. त्यानंतर ती मतपत्रिका बंद करून माझ्या खिशात ठेवली आणि नंतर ती मतपेटीत टाकली. तिथून मी बाहेर पडलो. तोपर्यंत कोणीही माझ्याविरोधात आक्षेप घेतला नव्हता. त्यानंतर मला समजले की, माझ्याविरोधात आक्षेप घेण्यात आला आहे. हा केवळ रडीचा डाव असून मुद्दाम संभ्रम निर्माण केला जात आहे. मला इतर कोणाचे काही माहिती नाही. मात्र माझी कोणतीही चूक नसताना का आक्षेप घेण्यात आला हे मला कळलेले नाही. मला चुकीच्या पद्धतीने घेरण्यात आल्याचे वाईट वाटत असल्याची प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
आदित्य ठाकरेंच्या चाणाक्षपणामुळे महाविकास आघाडीचे एक मत वाचले
राज्यसभा निवडणुकीच्या मतदानासाठी प्रत्येक आमदारांना दिलेल्या मतपत्रिकेच्या मागील बाजूस निवडणूक आयोगाचा स्टॅम्प मारण्यात आला होता. मात्र शिवसेना नेते-पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना देण्यात आलेल्या मतपत्रिकेच्या मागील बाजूस स्टॅम्पच नव्हता. ही बाब आदित्य ठाकरे यांच्या चाणाक्ष नजरेने टिपली आणि निवडणूक अधिकाऱयांच्या निदर्शनास आणली. मतपत्रिकेकर स्टॅम्प नसल्याचे निवडणूक अधिकाऱयांच्या निदर्शनास येताच निवडणूक अधिकाऱयांनी आदित्य ठाकरे यांना नवीन मतपत्रिका दिली. त्यानंतर त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. मतपत्रिकेवर शिक्का नसता तर ते मत बाद ठरले असते, पण आदित्य ठाकरे यांच्या चाणाक्षपणामुळे महाविकास आघाडीचे एक मत वाचल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
























































