
प्रसिद्ध अभिनेत्री रकुल प्रीतने आज तिच्या वाढदिवशी आयुष्यातील ‘त्या’ खास व्यक्तीची घोषणा केली आहे. रकुलने आज इंस्टाग्रामवर त्या व्यक्तीसोबतचा फोटो शेअर करत एक पोस्ट लिहली आहे. ती व्यक्ती म्हणजे बॉलिवूड अभिनेता जॅकी भगनानी आहे.
रकुल व जॅकी गेल्या वर्षभरापासून एकमेकांना डेट करत आहेत. मात्र त्याची कानोकान कुणाला खबर नव्हती. अखेर आज रकुलने तिच्या वाढदिवशी ही खबर चाहत्यांना दिली. ‘थँक्यू माय लव्ह, तु माझं या वर्षीचं सर्वात मोठं गिफ्ट आहे. माझ्या आयुष्यात रंग भरण्यासाठी थँक यू. मला सतत हसवत ठेवण्यासाठी थँक यू, तु जसा आहेस तसाच राहण्यासाठी थँकयू, आता आपण सोबत राहून बऱ्याच आठवणी बनवू’, अशी पोस्ट रकुलने शेअर केली आहे.
रकुलच्या या पोस्टनंतर जॅकीने देखील त्याच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ‘तुझ्याशिवाय आता दिवस दिवसासारखा नाही वाचत. तुझ्याशिवाय आता सर्वात लज्जतदार जेवण खाण्यातही मजा नाही. माझे जग असलेल्या या व्यक्तीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझा दिवस तुझ्या हसण्याइतकाच सुंदर जावा. वाढदिवसाच्या शुभेच्छा’ अशी पोस्ट जॅकीने शेअर केली आहे.



























































