भव्य राम मंदिराचे बांधकाम सुरू!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । लखनौ

प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर आयोध्येत उभे राहावे ही करोडो हिंदूंची अनेक वर्षांपासून इच्छा अद्याप पूर्ण झालेली नाही, मात्र थायलंडमधील अयुथ्थया येथे राम मंदिराची उभारणी जोरात सुरू झाली आहे. रामजन्मभूमी निर्माण न्यास ट्रस्टकडून या मंदिराचे बांधकाम सुरू आहे.

बँकॉक येथून रामजन्मभूमी निर्माण न्यास ट्रस्टचे अध्यक्ष महंत जन्मेजेय शरण यांनी याबाबत माहिती दिली. आयोध्येत भव्य राम मंदिर उभे राहण्यास विलंब लागत आहे. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण आहे, मात्र अयुथ्थया येथे भव्य राम मंदिर उभे राहणार आहे. त्याचे भूमिपूजन झाल्यानंतर आज प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात केली आहे. प्रभू श्रीरामांची शिकवण जगभरात पोहचविण्यासाठी मंदिर उभे केले जात आहे. हे मंदिर भव्य असेल असे शरण यांनी सांगितले. पुढील वर्षी २०१९ मध्ये होणाऱया कुंभमेळय़ापूर्वीच आयोध्येत राम मंदिर उभारणीच्या कामाला सुरुवात होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
१५व्या शतकात थायलंडची राजधानी ‘आयोध्या’ होती

चाव फ्राया नदीच्या तीरावर राम मंदिराचे बांधकाम सुरू आहे. बँकॉक शहरातून ही नदी वाहते. १५ व्या शतकात बँकॉकचे नाव अयुथ्थया असे होते. थायलंडच्या स्थानिक भाषेत अयुथ्थयाला ‘आयोध्या’ म्हणतात. त्यामुळे आयोध्या ही थायलंडची राजधानी होती. तेथे स्थानिक भाषेत रामायणही आहे अशी माहिती शरण यांनी दिली.