
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकल पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांचा आज वाढदिवस आहे. कवी मनाच्या आठवल्या यांना अनेक नेत्यांनी, आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. यात सर्वात हटके पद्धतीने गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनीदेखील रामदास आठवले स्टाईल कविता लिहून आठवले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. देशमुख यांनी फेसबुकवर एक कविता शेअर करत आठवले यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.































































