योगगुरू रामदेव बाबांची सर्वोच्च न्यायालयात धाव, देशभरात दाखल केलेल्या एफआयआरला दिले आव्हान

कोरोना महामारीत अॅलोपॅथीबाबत वादग्रस्त विधान करणारे योगगुरू रामदेव बाबा यांनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. डॉक्टरांच्या तक्रारीवरून त्यांच्याविरुद्ध देशभर विविध ठिकाणी एफआयआर दाखल झाले आहेत. ते सर्व एफआयआर एकत्र करून दिल्लीत वर्ग करण्यात यावेत, तसेच या एफआयआरवरील कारवाईला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी याचिकेतून केली आहे.

रामदेव बाबांनी गेल्या महिन्यात अॅलोपॅथीला मूर्खात काढले होते. देशात अॅलोपॅथिक औषधांमुळेच लाखो लोकांचा मृत्यू झाला, असा दावा करणारा त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला. त्यावर इंडियन मेडिकल असोसिएशनने तीव्र आक्षेप घेत देशभरात विविध ठिकाणी रामदेव बाबांविरोधात एफआयआर दाखल केले. या एफआयआरवरील कारवाईला स्थगिती देण्याची मागणी करीत रामदेव बाबांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका केली आहे. त्यांच्या वादग्रस्त विधानांविरोधात देशभर अनेक ठिकाणी डॉक्टरांनी तीव्र निदर्शने केली होती. या प्रकरणात डॉक्टरांनी कठोर भूमिका घेतल्यामुळे रामदेव बाबांच्या संकटात वाढ झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या