बॉलीवूड म्हणजे दुराचाराचा अड्डाच!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

अभिनेता नाना पाटेकर आणि अभिनेत्री तनुश्री दत्ता यांच्यातील वादानंतर अनेकांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या. आता या वादात योगगुरू रामदेवबाबांनी उडी घेतली आहे. ‘बॉलीवूड म्हणजे दुराचाराचा अड्डा’ असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सध्या जे काही चालले आहे, आरोप-प्रत्यारोप होत आहेत त्याला कुणी एक व्यक्ती जबाबदार नाही तर संपूर्ण समाज आणि देशाने सामूहिक जबाबदारी म्हणून देशाचे चारित्र्य घडवले पाहिजे असे मत रामदेवबाबांनी व्यक्त केले आहे. नाना-तनुश्री वादात कोण खरे आणि कोण खोटे आहे हे चौकशीतून पुढे येईलच, पण सध्या जे काही चालले आहे ते योग्य नाही. दुराचार कुठे नाही! तो सर्वत्रच आहे. बॉलीवूड, धर्मकारण आणि राजकारणात सर्वत्र दुराचाराने पाय पसरले आहेत. मात्र बॉलीवूड हा दुचाराचा अड्डा असल्याचे त्यांनी ठामपणे म्हटले आहे. दरम्यान, बाबांनी महागाईवरून भाजपला कानपिचक्याही दिल्या. महागाई प्रचंड वाढली आहे. त्यामुळे लोकांनी शक्यतो पायीच प्रवास करावा. पायी चालण्याची सवय लावून घ्यावी. जवळ जायचे असेल तरी सायकलचाच वापर करावा. तसेच गरीबांना आता सरकारवरच अवलंबून राहावे लागणार आहे अशा शब्दांत बाबांनी सरकारला टोला लगावला  आहे.