तेरी मेरी कहानीत ट्विस्ट, मी रानू मंडलचा मॅनेजर नाही; हिमेश रेशमिया संतापला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बंगालमधील स्टेशनवर गाणे गाऊन पोट भरणारी गोड गळ्याची रानू मंडल हिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि ती एका रात्रीत स्टार बनली. रानूचा व्हिडीओ बघून गायक आणि संगीतकार हिमेश रेशमियाने तिला चित्रपटात गाण्याची संधीही दिली. ‘तेरी मेरी…तेरी मेरी कहानी’ असं म्हणत रसिकांना हिमेश आणि रानू जोडीने साद घातली. मात्र आता त्यांच्या कहानीत ट्विस्ट आल्यासारखे वाटत आहे.  कारण ‘मी रानू मंडलचा मॅनेजर नाही’, असे संतप्त उद्गार हिमेशने काढले आहे.

हिमेशला एका कार्यक्रमात पत्रकारांनी रानूबद्दल प्रश्न विचारले. त्यावर हिमेशने या प्रश्नांची उत्तरे तर दिली नाहीतच, उलट तो या प्रश्नांमुळे चांगलाच संतापला. ‘मी काही रानू मंडलचा मॅनेजर नाही’ असे रागाने उत्तर देत तो तिथून निघून गेला.

काही महिन्यांपूर्वी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या मधुर आवाजातील ‘एक प्यार का नगमा’ हे गाणे गाऊन रानू मंडल इंटरनेट सेन्सेशन बनली. रानू मंडलचे सर्वच स्तरातून कौतुक होऊ लागले. तेव्हापासून रानू नेहमीच चर्चेत आहे.