Video – मी असेपर्यंत खुशाल गाई कापा, रावसाहेब दानवे यांचा हिरवा बाणा

5924
raosaheb-danve

मी असेपर्यंत खुशाल गायी कापा, तुम्हाला कोणी मनाई करणार नाही! भाजपचे ज्येष्ठ नेते तसेच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलेल्या माथेफिरू विधानामुळे हिंदुत्ववाद्यांच्या संतापाचा कडेलोट झाला आहे. सोशल मीडियावर दानवेंना शिव्याशाप देण्यात येत आहेत. मात्र आपण असे काही बोललो नसल्याची पलटी रावसाहेब दानवे यांनी मारली आहे. व्हिडीओमध्ये छेडछाड करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

भोकरदन मतदारसंघात रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव संतोष हे भाजपकडून मैदानात आहेत. त्यांच्या प्रचारासाठी 19 ऑक्टोबर रोजी रावसाहेब दानवे यांनी कठोरा बाजार येथे मुसलमानांची सभा घेतली. या सभेत रावसाहेब दानवे यांनी केलेल्या भाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या भाषणात दानवे यांनी मोदी सरकारने केलेल्या गोहत्या बंदी कायद्याची जाहीर कत्तल केली. आपण आहोत तोपर्यंत मुसलमानांनी खुशाल गायी कापाव्यात असा हिरवा बाणा त्यांनी दाखवला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच हिंदुत्ववाद्यांमध्ये एकच खळबळ उडाली. रावसाहेब दानवे यांच्यावर शिव्यांचा भडिमार सुरू झाला.

मी असे बोललोच नाही

सोशल मीडियावर हिंदुत्ववाद्यांनी चेचल्यानंतर रावसाहेब दानवे यांनी मंगळवारी सायंकाळी एक पत्रक काढून यासंदर्भात खुलासा केला. कठोरा बाजार येथील सभेत आपण असे काहीही बोललो नाही असा दावा त्यांनी केला असून या व्हिडीओशी छेडछाड करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

दोन नंबरचे धंदे… 

केंद्रात आपले सरकार आल्यानंतर देशभरात भ्रष्टाचार कमी झाल्याचे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. मात्र या व्हिडीओत रावसाहेब दानवे यांनी आपल्या तालुक्यात दोन नंबरचे धंदे जोरात चालत असल्याची चक्क कबुली दिली आहे. आपण मनात आणले तर दोन मिनिटांत हे धंदे बंद करू शकतो अशी फुशारकीही त्यांनी मारली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या