
मध्य प्रदेशमधील रिवा सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी महंत सितारामला पोलिसांनी अटक केली आहे. वेश बदलून उत्तर प्रदेशमध्ये पळून जाण्याच्या तयारीमध्ये असताना महंत सितारमाला सिंगरौली जिल्ह्यातून बेड्या ठोकण्यात आल्या.
रिवा येथील राज निवास सामूहिक बलात्कार प्रकरणी मध्य प्रदेशच्या मख्यमंत्र्यांनी महंत सिताराम याला अटक करण्याचे आदेश दिले होते. शिवराज सिंह चौहान यांच्या आदेशानंतर पोलिसांनी महंत सिताराम याच्या घरावर बुलडोझर चालवला आहे. तसंच, सिताराम याच्या अन्य संपत्तीवरही टाच आणण्याचे आदेश चौहान यांनी दिले आहेत.
व्हीयआयपी राज निवासमध्ये 28 मार्च रोजी एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर कथावाचक महंत सितारामने साथिदारांच्या मदतीने बलात्कार केला होता. त्यानंतर तो गुडवा इथल्या आपल्या घरात लपून बसला होता. नंतर तो सिंगरोली येथे पळून आला. वेश बदलण्यासाठी सिताराम बेंढन बस स्टँडवरील एका न्हाव्याच्या दुकाने गेलेला असताना त्याला अटक करण्यात आली.
बलात्कारानंतर लपून बसण्यासाठी ज्या घरात सिताराम राहिला होता, त्याच घरावर बुलडोझर चालवण्यात आला आहे. पोलिसांची गाडी बंद पडल्याने पोलिसांनी त्याला पोलीस स्टेशन ते कोर्ट या अंतरात पायी चालवत त्याची वरात काढली. त्याचा चेहरा झाकलेला होता. मात्र, पायात चप्पल नसल्याने तापत्या उन्हात त्याला अनवाणी कोर्टात जावं लागलं. त्याच्यासोबत विनोद पांडे हा सराईत गुन्हेगार देखील होता.

























































