
रत्नागिरीत एका तरूणीला दुचाकीवर बसवून चंपक मैदानात नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. ह्रषिकेश दगडू तळेकर (वय 20, रा.उद्यमनगर, रत्नागिरी) असे आरोपीचे नाव आहे. बुधवारी सायंकाळी त्याने कामावरून घरी जाणाऱ्या एका तरूणीला रस्त्यावर अडवले. तिला जबरदस्तीने गाडीवर बसवून चंपक मैदानातील झुडपात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. बलात्कारानंतर ह्रषिकेशने तिचा गळा आवळून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्या मुलीने मी हा प्रकार कुणाला सांगणार नाही, मला सोड असं सांगितले. कशीबशी त्याच्यापासून सुटका करून घेत तिने घर गाठले. घरी जाऊन हा घडलेला प्रकार तिने सांगताच परिसरातील लोकांनी ह्रषिकेश तळेकरचा शोध घेतला आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.























































