पालघरमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार, दोघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । पालघर

पालघरमध्ये दोन अल्पवयीन मुलांनी एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही आरोपींचेही वय 17 असून ते स्थानिक शाळेचे विद्यार्थी आहेत.

शुक्रवारी मोखाडामध्ये एका गावाजवळ ही घटना घडली. पीडित मुलगी जेव्हा बँकेतून आपल्या घराकडे चालली होती, तेव्हा आरोपींनी मुलीला पाहिले. आरोपी दुचाकी घेऊन तिच्याजवळ पोहोचले आणि कुठे जाते असे विचारले. त्यानंतर मुलीला जवळच्या झाडाझुडपात खेचून नेले आणि बलात्कार केला. पीडित मुलगी घरी पोहोचल्यानंतर याबाबत आपल्या पालकांना झालेला प्रकर सांगितला. त्यानंतर आई वडिलांसोबत पीडितेने पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली. पोलिसांनी कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई सुरू आहे.