सहा अल्पवयीन मुलींवर सामुहिक बलात्कार, सात तरुणांवर आरोप

1335

झारखंडमध्ये सहा अल्पवयीन मुलींवर सामुहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरी जात असताना सात तरुणांनी त्यांचे अपहरण केले आणि त्यांच्यावर बलात्कार केला आहे.

News 18 Hindi ने याबाबत वृत्त दिले आहे. रांची आणि खुंटी जिल्ह्याच्या सीमेवरील ही घटना आहे. सर्व मुली जत्रेत फिरण्यासाठी गेल्या होत्या. रात्री घरी परतताना त्यांना काही तरुणांनी पळवून नेले. त्यांना एका निर्जन ठिकाणी नेऊन त्यांच्यावर सर्व तरुणांनी सामुहिक बलात्कार केला.

घटनेनंतर नराधम तरुणांच्या तावडीतून दोन मुली कशाबशा घरी पोहोचल्या. गावात पोहोचल्यावर त्यांनी आपल्या पालकांना व गावकर्‍यांना सर्व माहिती सांगितली. तेव्हा गावकर्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि उर्वरित मुलींना आरोपींच्या तावडीतून सोडवले. गावकर्‍यांनी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी चौकशी करून आरोपींना अटक करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेमुळे गावात चांगलाच तणव निर्माण झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या