निसर्गाचा चमत्कार! केरळमध्ये 12 वर्षांनी उमलतं दुर्मीळ फूल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निसर्गाचा चमत्काराला काय म्हणावं. त्याला आपण हात जोडण्यापलीकडे आपण काहीही करू शकत नाही. असाच एक चमत्कार म्हणजे हिंदुस्थानात आढळणारे नीलकुरींजी हे फूल. नीलकुरींजी म्हणजे एक सुंदर रहस्य आहे. 12 वर्षांनी हे फूल एकदा उमलतं. केरळ राज्यातील मुन्नारमध्ये आढळणारे हे दुर्मिळ फूल बघण्यासाठी लोक दुरदूरूहून येतात.

नीलकुरींजी हे एक मोसमी फूल असून ते कित्येक वर्षांनी एकदा उमलतं आणि लगेच कोमेजून जातं. त्यानंतर ते पुन्हा बहरण्यासाठी कित्येक वर्षे लागतात. ही प्रजाती जगात दुसरीकडे कुठे सापडत नाही.

केरळमध्ये नीलकुरींजी फूल म्हणजे प्रेमाचे प्रतीक मानले जाते. नीलकुरींजी फुलामुळे केरळमधील पर्यटनाला बहर येतो. नीलकुरींजीपेक्षाही जास्त दुर्मिळ त्याचा मध असतो. या मधाला कुरींजीथन म्हणतात. स्थानिक आदिवासीच हा मध मिळवू शकतात, मात्र विकू शकत नाहीत.