
दोन दुर्मिळ खडक ज्यातून भगवान श्रीरामाची मूर्ती कोरून राम मंदिराच्या गर्भगृहात ठेवली जाईल ते बुधवारी उशिरा उत्तर प्रदेशातील अयोध्येत पोहोचले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अयोध्येतील संत आज या देव शीलांचा सत्कार आणि समर्पण करतील.
’60 दशलक्ष वर्षे जुने असलेले हे शालिग्राम खडक दोन वेगवेगळ्या ट्रकमधून नेपाळहून अयोध्येत पोहोचले आहेत. एका खडकाचे वजन 26 टन आणि दुसऱ्याचे वजन 14 टन आहे’, असे श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कार्यालयीन प्रभारी प्रकाश गुप्ता यांनी सांगितले. पीटीआयने ही माहिती दिली आहे.
या दगडातून कोरलेली प्रभू रामाची त्यांच्या बालस्वरूपातील मूर्ती राम मंदिराच्या गर्भगृहात ठेवली जाईल, जी पुढील वर्षी जानेवारीमध्ये मकर संक्रांतीच्या सणापर्यंत तयार होईल, असे अधिकाऱ्यांनी पीटीआयला सांगितले.
हे दोन खडक गंडकी नदीत नेपाळच्या मुस्तांग जिल्ह्यातील शालिग्राम किंवा मुक्तिनाथ (मोक्षाचे ठिकाण) जवळच्या ठिकाणी सापडले, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, शनिवारी अयोध्येत राम मंदिराच्या इमारत बांधकाम समितीची दोन दिवसीय बैठक सुरू झाली.
बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला ट्रस्टचे सचिव चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा उपस्थित होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदिराच्या बांधकामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला आणि नवीन मूर्तीची स्थापना आणि कोरीव कामावर चर्चा करण्यात आली.
























































