रश्मी शुक्ला राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्तपदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय बर्वे यांची राज्याच्या अॅण्टी करप्शन ब्युरोच्या संचालकपदी नियुक्ती झाल्यानंतर रिक्त झालेल्या राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्तपदी आज शासनाने अपर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची नियुक्ती केली. तर अपर पोलीस महासंचालक कनकरत्नम आणि हेमंत नगराळे यांना पोलीस महासंचालकपदी बढती देण्यात आली.

अपर पोलीस महासंचालक संदीप बिष्णोई यांच्याकडे महामार्ग पोलीस विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली, तर कनकरत्नम यांना महासंचालकपदी बढती देऊन त्यांच्याकडे महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाचे प्रमुख पद देण्यात आले. तसेच हेमंत नगराळे यांनादेखील महासंचालकपदी बढती देऊन त्यांची एफएसएलच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

summary- rashmi shukla became commissioner of intelligence