श्रीलंकेत महागाई गगनाला भिडली, गॅस सिलिंडरचा दर 2657 रुपये

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या संकटानंतर आता श्रीलंकेत महागाईचे नवे संकट पुढे आले आहे. श्रीलंकन सरकारने अत्यावश्यक वस्तूंवरील दरनियंत्रण हटवताच महागाईने परिसीमा गाठली आहे. सोमवारी स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या दरात सुमारे 90 टक्के वाढ झाली. त्यामुळे शुक्रवारपर्यंत 1400 रुपयांना मिळणार गॅस सिलिंडर आता तब्बल 2657 रुपयांना विकत घ्यावा लागत आहे. तर 250 रुपये किलो दराने मिळणारी मिल्क पावडर 1 किलोला 1195 रुपये खर्चून घ्यावी लागत आहे. सरकारच्या धक्कादायक घोषणेमुळे श्रीलंकन जनता महागाईच्या वणव्यात होरपळत असून नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.