जूनमध्ये व्याजदर कमी होणार

61

सामना ऑनलाईन । मुंबई

वाढती महागाई आणि वित्तीय तुटीच्या पार्श्वभूमीवर, जूनमध्ये होणाऱ्या आरबीआयच्या बैठकीत व्याजदर कमी होण्याची शक्यता आहे. आयएचएस मार्किट संस्थेने ही शक्यता वर्तवली आहे. सरासरी कमी पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केल्यामुळे अन्न आणि इंधनाचे दर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे महागाईचा दर 5 टक्क्यांच्या पुढे जाईल, असेही संस्थेच्या अहवालात म्हटले आहे. आरबीआयने फेब्रुवारी आणि एप्रिल 2019 मध्ये पाव टक्क्यांनी व्याजदरात कपात केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या