रत्नागिरी – कोल्हापूरला जोडणारा आंबाघाट पुढील चार दिवसात सुरू होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारा आंबाघाट येत्या चारपाच दिवसात पुर्ववत सुरू होईल अशी माहिती आमदार राजन साळवी यांनी दिली आहे. अतिवृष्टीमुळे आंबाघाटात मोठ्या प्रमाणात दरड कोसळली होती. त्यामुळे गेले काही महिने या मार्गावरील वाहतूक बंद होती.

अतिवृष्टीत आंबाघाटात दरड कोसळल्याने येथील वाहतूक काही महिने बंद होती. त्यानंतर तात्पुरती डागडूजी करून छोटया वाहनांसाठी वाहतूक सुरु करण्यात आली. मोठ्या वाहनांची वाहतूक पाचल अणस्कुरा मार्गे कोल्हापूर अशी वळवण्यात आली होती. अलिकडेच खासदार विनायक राऊत यांनीही आंबाघाटाचा दौरा करून पाहणी केली होती. त्यानंतर पालकमंत्री अॅड. अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात आंबाघाट सुरु करण्याबाबत एक बैठकही पार पडली. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालक वसंत पन्दरकर, राष्ट्रीय महामार्ग सहाय्यक अभियंता विलास पाटील, कनिष्ठ अभियंता कौशिक रहाटे यांच्याशी आमदार राजन साळवी यांनी चर्चा केल्यानंतर त्यांनी पुढील चार दिवसात आंबाघाट सुरु होईल असे सांगितले.