रत्नागिरी – आर्ट सर्कलचा संगीत महोत्सव 22 ते 24 जानेवारीला रंगणार

आर्ट सर्कल रत्नागिरीच्या वतीने थिबा राजवाडा येथे 22 ते 24 जानेवारी दरम्यान संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शास्त्रीय संगीतातील हिंदूस्थानचे भविष्य या संकल्पनेवर आधारीत हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. नव्या पिढीतील दमदार गायक आणि वादक या महोत्सवात सहभागी होणार आहेत. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर हा संगीत महोत्सव महाराष्ट्र शासन, पुरातत्व खाते आणि स्थानिक प्रशासन यांच्या सहकार्यामुळे साध्य होत आहे. 22 जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता महोत्सवाचे उद्‌घाटन होणार आहे.

पहिल्या दिवशी मानसकुमार याचे व्हायोलिनवादन होणार असून त्याला तबला साथ तनय रेगे करणार आहे. त्यानंतर सोनल शिवकुमार यांचे गायन होणार आहे. शनिवार 23 जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता युवा शास्त्रीय गायक आदित्य खांडवे मैफिल रंगवणार आहेत. त्यांना तबलासाथ प्रसाद करंबेळकर आणि संवादिनी साथ वरद सोहोनी करणार आहेत. त्यानंतर कौस्तुभ कांती गांगुली यांचे गायन होणार आहे. त्याला तबलासाथ तेजोवृष जोशी आणि संवादिनी साथ हर्षल काटदरे करणार आहेत. रविवारी 24 जानेवारी रोजी सरोद वादक अभिषेक बोरकर यांची मैफिल रंगणार आहे. महोत्सवाचा समारोप शास्त्रीय गायिका सावनी शेंडे यांच्या गायनाने होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या