रत्नागिरीत प्रचाराच्या तोफा थंडावल्या, छुपा प्रचार सुरू

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात दीड महिना सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या.आज सायंकाळी पाच वाजता प्रचार थंडावला.थेट प्रचार थंडावला तरी छुप्या प्रचाराला सुरूवात होणार आहे.सावधान रात्र वैऱ्याची आहे.आपल्या वाडीवस्त्यांवर विरोधकांना राजकीय फोडाफोडी करून देऊ नका अशा सूचनाच पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

16 मार्च रोजी लोकसभा निवडणूक जाहिर झाल्यापासून रणधुमाळीला सुरूवात झाली 12 एप्रिल ते 19 एप्रिल दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्यात आले.त्यानंतर प्रचारसभांचा झंझावात सुरू झाला. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे,शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या प्रचंड विराट सभा झाल्या.मशाल रॅलीने प्रचाराचे रान पेटवले.उमेदवार विनायक राऊत यांनी १०७ खळा बैठका घेतल्या.जिल्हापरिषद गटनिहाय मेळावे जनतेशी संवाद साधला. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात ९ उमेदवार रिंगणात आहेत.त्यामध्ये इंडिया आघाडीचे उमेदवार विनायक राऊत,बहुजन समाज पक्षाचे राजेंद्र आयरे,सैनिक समाज पक्षाकडून सुरेश शिंदे,वंचित बहुजन आघाडीकडून मारूती जोशी,बहुजन मुक्ती पार्टीकडून अशोक पवार,महायुतीकडून नारायण राणे,अपक्ष शकील सावंत,अमृत तांबडे,विनायक लवू राऊत निवडणूक लढवत आहेत.

गेले दिड महिने सुरू असलेला प्रचार आज सायंकाळी पाच वाजता संपला.छुपा प्रचार सुरू होणार असून कार्यकर्त्यांना डोळ्यात अंजन घालून जागे रहावे लागणार आहे.