तीन तालुक्यात मोबाईल तपासणी यंत्रणा, कोरोना आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना

कोरोनाचा प्रसार होऊ नये या दृष्टिकोनाने कोरोनाविषयक तपासणीसाठी तीन तालुक्यात तातडीने मोबाईल टेस्टींग व्हॅन युनिट सुरु करण्याचे निर्देश रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज व्हीसी द्वारे आयोजित कोरोना आढावा बैठकीत दिले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय येथून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इन्दुराणी जाखड, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, प्रांतअधिकारी विकास सुर्यवंशी आदि संबधित अधिकारी तर व्हीसीद्वारे तालुकास्तरावरील संबधित अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांनी खेड, चिपळूण व दापोली या तालुक्यात तातडीने मोबाईल टेस्टींग व्हॅन युनिट सुरु करा. ग्राम कृती दल व नागरी कृती दल यांनी याआधी चांगल काम केलं असून त्यांना पुन्हा कार्यान्वित करा, त्यांच्या बैठका घ्या. जिल्हयात बाहेरुन येणाऱ्यांवर नजर ठेवा. ज्या हॉस्पीटलमध्ये ओपीडी जास्त आहे अशा ठिकाणी आणखी टेस्टींग वाढवा अशा सूचना दिल्या.

आपली प्रतिक्रिया द्या