
गेले अनेक दिवसांपांसून प्रतिक्षा असलेली कोरोनाची लस बुधवारी रात्री रत्नागिरीत दाखल झाली.कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात 14 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येणार आहे.
कोरोना लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच रत्नागिरीत तीन ठिकाणी ड्राय रन घेण्यात आला.लसीकरणाच्या रंगीत तालिमीनंतर सर्वांना लसीची प्रतिक्षा होती.ती लस बुधवारी जिल्हा रूग्णालयात दाखल झाली आहे.
मार्च 2020 पासून रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. आतापर्यंत जिल्ह्यात 9 हजार 360 जणांना कोरोनाची लागण झाली होती त्यापैकी 8 हजार 893 जण बरे झाले. बरे होण्याचे प्रमाण 95.01 आहे. कोरोनामुळे 361 जणांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 3.61 टक्के आहे.



























































