रत्नागिरीत कोरोना लसीकरणाला प्रारंभ, डॉ.सई धूरींनी घेतली दुसरी लस

रत्नागिरी जिल्हा रूग्णालयात कोरोना लसीकरणाला आजपासून प्रारंभ झाला.जिल्हा रूग्णालयाच्या अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ.सई धूरी यांनी पहिली लस घेतली.

जिल्हा रूग्णालयातील लसीकरणाच्या शुभारंभाप्रसंगी आमदार राजन साळवी,जिल्हापरिषद आरोग्य सभापती महेश म्हाप,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संघमित्रा फुले उपस्थित होत्या.कोविशिल्डचा पहिला डोस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सई धूरी यांनी घेतला.त्यानंतर डॉक्टर,नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले.सर्वप्रथम लसीकरणासाठी येणाऱ्या व्यक्तींचे आधार कार्ड आणि पॅन कार्डची पहाणी करून लस घेत असलेली व्यक्तीच्या फोटो आणि नावाची शहनिशा करून त्यानंतर त्या व्यक्तीला लस दिली जात होती.लसीकरणानंतर काही काळ त्याव्यक्तीला विश्रांती देऊन त्या व्यक्तीला लसीकरणानंतर काही त्रास होतो का? यांचे निरीक्षण केले जात होते.

जिल्ह्यात पाच ठिकाणी लसीकरण होणार आहे.त्यामध्ये जिल्हा रूग्णालय,उपजिल्हा रूग्णालय दापोली,उपजिल्हा रूग्णालय कामथे,ग्रामीण रूग्णालय गुहागर आणि राजापूरचा समावेश आहे. दर दिवशी 500 जणांना लसीकरण करण्यात येणार आहे.जिल्ह्यातील १५ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या