
रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणूकीत सर्व 11 जागांवर सहकार पॅनलने विजय मिळवला. शुक्रवारी रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 11 जागांसाठी मतदान झाले होते. आज मतमोजणीनंतर निकाल जाहीर करण्यात आला.
रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत सहकार पॅनलचा वरचष्मा राहिला आहे. यापुर्वीच सहकार पॅनलचे गजानन पाटील आणि सुरेश कांबळे बिनविरोध निवडून आले होते. त्यानंतर 11 जागांसाठी 14 उमेदवार रिंगणात होते. आज मतमोजणीनंतर सहकार पॅनलच्या 11 उमेदवारांना विजयी घोषित करण्यात आले. त्यामध्ये अरविंद आंब्रे – 1285 मते, विजय टाकळे – 1282मते, मधुकर दळवी – 1276 मते, नयनेश नारकर – 1281 मते, रोहीत मयेकर – 1270 मते, सुरेश सावंत – 1295 मते संदीप सुर्वे -1212 मते, स्मिता दळवी – 1426 मते, स्नेहल वाईत – 1407 मते, ओंकार कोलते – 1657 मते आणि प्रशांत शिंदे – 1646 मते मिळवून विजयी झाले आहेत.































































