रत्नागिरी – विश्वकर्मा ट्रेडर्सला लागलेली आग सवा चार तासांनी विझली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी शहरातील आरोग्य मंदिर येथील विश्वकर्मा ट्रेडर्स या दुकानाला सोमवारी रात्री अचानक आग लागली. या आगीत दुकानाचे प्रचंड नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. पहाटे पाच वाजेपर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. नगरपरिषद अग्निशमन बंब, फिनोलेक्स अग्निशमन बंब आणि एमआयडीसीचा अग्निशमन बंब आग विझविण्याचे काम करत होते.

सोमवारी रात्री एक वाजता अचानक आरोग्यमंदिर परिसरात धुराचे लोळ पसरले. रस्त्याशेजारीच असलेल्या दुकानाला आग लागली होती. तात्काळ नगरपरिषदेत आणि फिनोलेक्सचा अग्निशमन बंब पाचारण करण्यात आला. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्नानंतर भडकत चाललेली आग विझवली. रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात याबाबत नोंद नव्हती.

आग विझवताना हात भाजलं
रात्री विश्वकर्मा ट्रेडर्सला आग लागलेली दिसतात शेजारील दुकानदारांनी आग विझविण्यासाठी धडपड सुरु केली. नाना पुनस्कर, संजय पुनस्कर आणि अन्य जणांच्या शरीराला दुखापत झाली. विश्वकर्मा ट्रेडर्सला आग लागली तेव्हा त्यांचे मालकही राजस्थानला होते. शेजारी दुकानदार जागे असल्याने त्यांनी तात्काळ नगरपरिषदेला कळवले. सवा चार तास आग विझविण्याचा प्रयत्न सुरु होता. परिसरातील नागरिकांही रात्रभर जागे होते. आग विझवल्यानंतर जेसीबीने सामान बाहेर काढले.