रत्नागिरीत गौरी गणपतींना भर पावसात भावपूर्ण निरोप

352

रत्नागिरीतसध्या पावसाचा जोर कायम आहे मात्र अतिशय उत्साह पूर्ण वातावरणात गणपती बाप्पा मोरया च्या जयघोषात आज गौरी गणपतींचे भरपावसात विसर्जन करण्यात आले.रत्नागिरी जिल्ह्यातील 1 लाख 15 हजार 553 घरगुती आणि 14 सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

सोमवारी वाजत-गाजत गणपती बाप्पांचे आगमन झाले.रत्नागिरी जिल्ह्यात घरगुती गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो यंदा 1 लाख 66 हजार 587 घरगुती गणपतीची प्रतिष्ठापना झाली आहे तर 111 ठिकाणी सार्वजनिक गणेशमुर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. गेले सहा दिवस कोकणात मंगलमय वातावरणात गणपतीबाप्पाची पुजाअर्चा करण्यात आली. गुरुवारी गौरीचे थाटामाटात आगमन झाले. धो-धो कोसळणाऱ्या पावसात सायंकाळी चार वाजल्यानंतर गौरी गणपतीचे विसर्जन सुरु झाले.रत्नागिरीतील मांडवी समुद्रकिनारी धो-धो पावसात गणपतीची पुजाअर्जा करत विसर्जन करण्यात आले.निर्माल्य गोळा करण्याची चोख व्यवस्था रत्नागिरी नगर परिषदेने केली होती.

रत्नागिरी तालुक्यात  घरगुती १८४९५ आणि सार्वजनिक ५गणेशमुर्ती,संगमेश्वर तालुक्यात घरगुती १७३५३ गणेशमुर्ती,राजापूरात १६५२६ गणेशमुर्ती,लांजामध्ये घरगुती ११७७०, गुहागरात ९१५०,चिपळूणात २४३९५ घरगुती ,सार्वजनिक ३  खेड मध्ये घरगुती १०६३२, सार्वजनिक ४ ,मंडणगड मध्ये घरगुती ३४५४,सार्वजनिक १,दापोलीत ३७६८ घरगुती आणि १ सार्वजिनक गणेशमुर्तीचे आज विसर्जन करण्यात आले.

 

आपली प्रतिक्रिया द्या