अतिवृष्टीने रत्नागिरीला झोडपले, कमी दाबाच्या पट्‌ट्यामुळे वादळाचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बुधवारी रात्रीपासून वादळी वार्‍यासह मुसळधार पावसाने रत्नागिरीला झोडपून काढले़. सर्वच तालुक्यांमध्ये पावसाने हाहाकार माजवला़. अतिवृष्टीमुळे भातशेतीचे मोठ्‌या प्रमाणात नुकसान झाले आहे़. पुढील 24 तासांमध्ये जिल्ह्यात वादळी वार्यासह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे़. दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि कोकण पट्‌ट्यात कमी दाबाचा पट्‌टा निर्माण झाल्याने वादळाचा धोका वर्तवण्यात आला आहे़.

जिल्ह्यात गेल्या 24 तासात एकूण 374.20 मिमी तर सरासरी 41.58 मिमी इतका पाऊस पडला़. तालुकानिहाय पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे़. मंडणगड 9.20 मिमी, दापोली 18.40 मिमी, खेड 88.40 मिमी, गुहागर 46.10 मिमी, चिपळूण 29.20 मिमी, संगमेश्वर 55.80 मिमी, रत्नागिरी 56.30 मिमी, राजापूर 22.80 मिमी, लांजा 48 मिमी पावसाची नोंद झाली़.

खेड तालुक्यातील पन्हाजे येथील रस्ता पावसामुळे खचला आहे़. एकेरी वाहतूक सुरु असून कोणतीही जिवीतहानी नाही़. चिपळूण तालुक्यातील चिवेली येथील शंकर बाबू मांजलेकर यांच्या वाड्याचे अंशतः नुकसान झाले आहे़. चिंचघर कोरोगाव-भैरवली रस्ता खचला आहे़. एकेरी वाहतूक सुरु असून कोणतीही जिवीतहानी नाही़. दाभीळ सातीवगाव आयनी रस्त्यावर पावसाचे पाणी आल्याने रस्ता खराब झाला आहे़. एकेरी वाहतूक सुरु असून कोणतीही जिवीतहानी नाही़. संगमेश्वर तालुक्यात मेघी येथे दि़.13 ऑक्टोबर रोजी सोलकरवाडीतील जयराम गोपाळ हसम यांच्या घरावर वीज पडून घराचे अंशतः नुकसान झाले आहे़. घरातील 8 व्यक्ती जखमी झाल्या आहेत़. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे़. कडवई येथील सुनंदा गौराजी कांबळे यांच्या घराचे 37500 रुपयांचे नुकसान झाले आहे़. राजापूर तालुक्यातील चिखलगाव येथे 5 घरे, 5 गोठे, एका दुकानाचे अंशतः नुकसान झाले आहे़. धोपेश्वर येथे एक घर, एका गोठ्याचे नुकसान झाले आहे़.

नागरीकांना सावधानतेचा इशारा

जिल्ह्यात दि़.15 व 16 ऑक्टोबर 2020 रोजी काही ठिकाणी वादळी वारा व वीजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे़. तरी नागरीकांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे़. दि़.15 ते 17 ऑक्टोबर 2020 या कालावधीत किनारपट्‌टीलगतच्या सर्व जिल्ह्यांमध्ये वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे़. समुद्र खवळलेला असल्याने मच्छिमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये़. तसेच वीजेचे खांब, लोखंडी वस्तू, विद्युत वस्तूंपासून दूर राहावे़. वीजा चमकत असताना विद्युत उपकरणे बंद ठेवावीत असे आवाहन करण्यात आले आहे़. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उदभवल्यास तात्काळ नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा़. नियंत्रण कक्षांचे दूरध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत़. जिल्हा नियंत्रण कक्ष – 02352 – 226248/222233, जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष – 02352 – 222222/100, रत्नागिरी तहसील नियंत्रण कक्ष – 02352 – 223127, राजापूर तहसील नियंत्रण कक्ष – 02353 – 222027, लांजा तहसील नियंत्रण कक्ष – 02351 – 230024, संगमेश्वर तहसील नियंत्रण कक्ष – 02354 – 260024, चिपळूण तहसील नियंत्रण कक्ष – 02355 – 252044, गुहागर तहसील नियंत्रण कक्ष – 02359 – 240237, खेड तहसील नियंत्रण कक्ष – 02356 – 263031, दापोली तहसील नियंत्रण कक्ष – 02358 – 282036, मंडणगड तहसील नियंत्रण कक्ष – 023500 – 225236.