दाभोळेत घरफोडी, 1 लाख 90 हजार रुपयांचा माल लंपास

491
प्रातिनिधिक फोटो

दाभोळे बाजारपेठेतील एका बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत अज्ञात चोरट्याने 1 लाख 20 हजारांची रोख रक्कम आणि 70 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले.

राजाराम मारुती मांगलेकर, (वय 60, रा. दाभोळे बाजारपेठ) यांनी देवरुख पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद नोंदवली आहे़. फिर्यादी हे लांजा याठिकाणी कामानिमित्त गेले असताना त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. लोखंडी कपाटातील 1 लाख 20 हजारांची रोख रक्कम आणि 70 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले.

आपली प्रतिक्रिया द्या